कोरोनामुळे येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते पण अशी काही घोषणा आतापर्यंत केलेली नाही पंतप्रधान मोदी यांनी यांसंदर्भात कोविड कृती दलाशी चर्चा केली. कलम ३६० अन्वये राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतील. आणीबाणी मध्ये राज्यांचे आर्थिक अधिकार गोठतील व खर्चाचे अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असलीत. राज्यांच्या सर्व खर्चावर केंद्राचेच नियंत्रण असेल.
Image-आर्थिक आणीबाणी |
जाणून घेऊ आर्थिक आणीबाणी म्हणजे काय ???
देशाचे प्रथम नागरिक आणि घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतात.
राष्ट्रपती तीन प्रकारच्या आणीबाणी लागू करू शकतात.
१) राष्ट्रीय आणीबाणी - युद्ध, बाह्य आक्रमण, सहत्र उठाव यामुळे देशात आणीबाणी लावली जाऊ शकते. या घोषणेविषयी न्यायलायात दाद मागता येत नाही. १९६२- चीन युद्ध, १९७१- पाकिस्तान युद्ध, १९७५ -इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती.
२) राज्यातील राष्ट्रपती राजवट - एखाद्या राज्यात पेचप्रसंग निर्माण झाल्यास राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लावली जाते .
३) आर्थिक आणीबाणी - देशाची आर्थिक स्थिती धोक्यात आल्यास ही आणीबाणी लावली जाते. भारतात आर्थिक आणीबाणी अजून लागलेली नाही.
भारतीय घटनेमध्ये 360 या कलमामध्ये तशी तरतूद आहे.वेगवेगळ्या देशामध्ये याचे वेगळे नियम आहेत. राष्ट्रपतींना असे वाटले की देशामध्ये कोणत्याही भागात आर्थिक स्थैर्य किंवा वित्त नियोजनात कमतरता जाणवत आहे अथवा वित्त जीवन विस्कळीत किंवा कमकुवत झाले आहे अशा परिस्थितीमध्ये आर्थिक आणिबाणी लावली जावू शकते.
राष्ट्रपती राज्याचे सर्व मौद्रिक (Monetary) आणि वित्तीय(Financial) बिलाचे मसुदे स्वतःच्या देखरेखेखाली ठेवतात. आणि कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्यांची मंजुरी आवश्यक ठरते
आर्थिक आणिबाणीचा आपल्यावर काय परिणाम होतो ?
थेट परिणाम व्यवस्थेवर होतो. आर्थिक व्यवस्था चक्र थांबते. काही वेळेला नोकरदार आणि इतर कामगार वर्गाची पगार कपात केली जाते.यामध्ये कुणालाही सूट दिली जात नाही.
सरकारी नोकरदारांच्या पगारवाढीवर निर्बंध घातले जातात. तर सार्वजनिक सेवा देणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची वेळेवर पगार होण्याची कोणतीही शाश्वती नसते. याचा अप्रत्यक्ष परिणाम त्या वर्गावर किंवा तो वर्ग देत असलेल्या सेवेवर होत असतो.
उदाहरणार्थ -
शेजारच्याची नोकरी गेली तर मंदी येणार आहे असे आपण म्हणू शकतो. त्याच्याबरोबर आपली स्वतःची नोकरी गेली तर मंदी आलीच आहे असे आपण म्हणू शकतो. आपल्याला आर्थिक सल्ला देणाऱ्याची नोकरी गेली तर आर्थिक मंदी आली आहे असे आपण म्हणू शकतो. आणि शेवटी आपल्याला आर्थिक मदत करणाऱ्याची नोकरी गेली तर आर्थिक आणिबाणी दूर नाही असे म्हणायला हरकत नाही. अर्थात हे चक्र सुरळीत चालू असणाऱ्या व्यवस्थेला लागू होते.
No comments:
Post a Comment